लाख क्षण अपूरे
पडतात आयुष्याला दिशा देण्यासाठी,
पण एक चुक पुष्कळ आहे ते दिशाहीन करण्यासाठी,
किती प्रयास घ्यावे लागतात यशाचं शिखर चढण्यासाठी,
पण जरासा गर्व पुरा पडतो वरुन खाली गडगडण्यासाठी,
देवालाही दोष देतो आपण नवसाला न पावण्यासाठी,
किती सराव करावा लागतो विजयश्री वर नाव कोरण्यासाठी,
....पण जरासा आळस कारणीभूत ठरतो जिंकता जिंकता हरण्यासाठी,
किती तरी उत्तरं अपुरी पडतात आयुष्याचं गणित सुटण्यासाठी,
किती तरी अनुभवातनं जावं लागतं आयुष्य एक कोडं आहे हे पटण्यासाठी,
विश्वासाची ऊब द्यावी लागते नात्याला जीवनभर तारण्यासाठी,
एक अविश्वासाचा दगड सक्षम आहे ते कायमचं उद्धवस्त करण्यासाठी
कलीयुगाचे पर्व आहे..,
प्रत्येकालाच इथे गर्व आहे...!
मी आहे तरच सर्व आहे...,
नाहीतर सर्व व्यर्थ आहे...!!
अरे वेड्या....! कुणा वाचून कुणाच राहात नसतं..,
आदर कर सर्वांचा, हाच खरा मानव धर्म आहे...!!!
प्रेमाने जोडलेली चार माणसं व त्यासाठी लागणारे दोन गोड शब्द
हे वैभव ज्याच्याजवळ आहे..,
तोच या जगात खरा "श्रीमंत " आहे..!!!
तोच या जगात खरा "श्रीमंत " आहे..!!!
तर चला आपण सगळेच श्रीमंत होऊयात . . . . .