Pages

Monday, 13 November 2017

त्रासाचे झाड

मामांच्या कार्यालयात त्यांचाच भाचा कामाला होता. दूरचे नाते असले तरी कामात मात्र दोघांचे सगळेच पटायचे. कामाचा, कर्जाचा व मंदीचा व्याप वाढत असल्यामुळे तणाव, चिडचिड आणि वैताग हे रोजचेच झालेले. मामांना परिस्थिती सोसेनाशी झालेली. ‘ऑफिसमध्ये त्रास आहेच आणि घरीदेखील शांतता नाही,’ असे पुटपुटत मामा निघाले. संध्याकाळी घरी जायची वेळ होती. भाचाही घरी जाण्याच्या तयारीत होता. दोघे एकदमच उतरले. मामांनी भाच्याला म्हटले, बस माझ्या गाडीत ‘घरी सोडतो तुला.’ भाचा मामांच्या गाडीत बसला. कार्यालयापासून २०मिनिटांवर भाच्याचे घर होते. गाडी सुरू झाली व भाच्याचे घरही आले. वीस मिनिटे कशी गेली कळलेच नाही. गाडीत मौन होते, पण दोघांच्याही डोक्यात विचारांचा गोंधळ होता. घरी पोहोचल्यावर भाच्याने मामांना ‘चहा घेऊन जा’ असे म्हटले. उशीर झालेला तरी मामा उतरले. घराजवळ येऊनही आत न जाणे बरे दिसले नसते म्हणून मामा ‘पाच मिनिटांकरिता येतो’ असे म्हणाले. घराच्या दाराशी एक झाड होते. भाच्याने त्या झाडावर हात फिरवला, काहीतरी केले. मामांना काही कळले नाही. दाराची बेल मग त्याने वाजवली. दार उघडताच भाच्याच्या चेहर्‍यावरचे भाव एकदम बदलूनच गेले. त्याने हसत आपल्या बायकोला म्हटले, ‘‘पोचलो एकदाचा. किती छान वाटतंय आता. मामांसाठी मस्त चहा आण पाहू. समोर आलेल्या आपल्या पोरांना घट्ट मिठी मारली व खिशातून चॉकलेट काढून पोरांना दिले. मामांना हे सर्व पाहून प्रचंड आश्‍चर्य झाले. ऑफिसमध्ये वैतागलेला हा माणूस अचानक एका क्षणात कसा काय एवढा आनंदी झाला? गाडीतले मौन, विचारांची मारामारी खरी होती की हे घरातले हसणे-खिदळणे आणि आनंद ? मामांना प्रश्‍नच पडला. चहा घेऊन मामा  निघाले. भाचा मामांना गाडीपर्यंत सोडण्यासाठी आला. गाडीत बसता बसता मामांनी भाच्याला विचारले ‘‘दोन गोष्टी कळल्या नाहीत बेटा. त्या घराबाहेरील झाडाला तू काय केलेस आणि घरी पोहोचताच तुझे मौन पळून गेले. काय हे?’’ त्यावर भाचा म्हणाला, ‘‘मामा,  मी रोज घरी आलो की या झाडावर माझे सर्व त्रास टांगतो आणि आत जातो. त्यामुळे मी घरी पोहोचताच प्रसन्न होतो. दुसर्‍या दिवशी घरून निघताना पुन्हा त्या झाडावरून उचलतो. पण काल टांगलेले काही पडतात रात्रभरात आणि सकाळी कधीकधी त्रास झाडावर सापडतच नाहीत. हे आहे ‘‘त्रासांचे झाड.’’ प्रत्येकाने आपल्या घराबाहेर असेच एक त्रासांचे झाड लावावे. घरी जाताना त्रास बाहेर टांगून आत जावे. घरात फक्त आनंद असावा, त्रास नाही.

‘तुमच्या घराबाहेर आहे का ‘‘त्रासाचे झाड?’

😊😊

यालाच जीवन म्हणतात.

एकदा एका जंगलात एक हरीणी बाळाला जन्मं देणार असते.
पण ती ज्या ठीकाणी बसलेली असते तिथे जवळच एक वाघ तिच्यावर नजर ठेवून असतो.🐬🐬🐬
एका बाजूला एक शिकारी तिच्यावर बंदूक रोखून उभा असतो. आणि जवळच जंगलात वणवा पेटलेला असतो.

सगळ्या बाजूने दिसणार्या या संकटांपैकी एकतरी संकट तिला गिळून टाकेल याची तिला खात्री असते.

तो शिकारी बंदुकीतून गोळी सोडतो....वाघ जोरात झेप घेतो...आणि तितक्यात वीज चमकते...त्या शिकार्याचं लक्षं वेधलं जातं... आणि ती गोळी त्या वाघाला लागते...वीज चमकून गडगडाट होतो आणि पाऊस सुरु होतो... त्यामुळे वणवाही विझतो...आणि या सगळ्या गोष्टी होत असताना ती हरिणी हळूच एका लहानश्या हरणाला जन्मं देते...

माणसाचं आयुष्य हे असंच असतं...त्याच्या हातात काहीच नसतं..आपण फक्तं प्यादी असतो या पटावरची...कर्ता करविता असतो तो ईश्वर...

एक एक वाटत असताना कुठल्या क्षणी काय होईल काहीच सांगता येत नाही...मारणाराही तोच असतो आणि तारणाराही तोच...

कर्माचा सिद्धांत हा कीतीही खरा असला तरी शेक्सपिअरचं एक वाक्यं खूप काही सांगून जातं...

"Behind every misfortune there is a crime... But behind every crime there is a misfortune...!"

आयुष्य हे असंच असतं... कुणाला दोष द्यावा आणि कुणाचं कौतुक करावं... दोन्ही एकाच रथाची चाकं...

कुठलं खड्डयात अडकणार आणि कुठलं वर टांगून राहणार हे ठरवणारा मात्र तोच...

"समुद्रात बुडून त्याचा म्रुत्यु झाला"...पण त्याच्या मनातून समुद्राकडे तो त्याक्षणी कसा ओढला गेला? कोण सांगेल?

"चाळीस घरांच्या ढिगार्याखाली गाडलं गेलेलं सहा महीन्यांच बाळ, 30 तासांनंतरही तसच छान हसत खेळत सापडतं"...

त्याला त्या ढिगार्यातही कुशीत घेणारं कोण असतं?

"नेहमीच्याच रस्त्याने जाणारी एक बस अचानक एक दिवस दरीत कोसळते."तिला दरीत ढकलणारं असतं कोण? वारा? की ड्रायव्हर? की ड्रायव्हरच्या डोळ्यासमोर अचानक आलेला अंधार? कोण सांगेल?

एका मुलाच्या रोजच्या नेहमीच्या ट्रेनमधे बाम्बस्फोट होतो... पण तो त्यादिवशी ऑफिसला गेलेलाच नसतो... त्यामुळे तो वाचतो...

ऑफिसला न जाण्याची इच्छा त्याला त्याच दिवशी का होते? कोण सांगेल?

त्या हरिणीच्या बाळाचा जन्मं होताना अचानक वीज का चमकली?कोण सांगेल? कोण सांगेल कोण??कुणीच नाही...हे असंच असतं... भक्तीने रुजवलेलं ... प्रेमाने सावरलेलं... आसक्तीने बुडवलेलं... कर्माच्या चक्रात अडकलेलं...ईश्वराने लिहीलेलं ... आपलं आयुष्यं...!

मोर नाचताना सुद्धा रडतो... आणि..राजहंस मरताना सुद्धा गातो....

दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही...आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही.

*यालाच जीवन म्हणतात.*

किती दिवसाचे आयुष्य असते?आजचे अस्तित्व उद्या नसते,मग जगावे ते हसून-खेळूनकारण या जगात उद्या काय* होईलते कोणालाच माहित नसते...!!
नशिबाने दिलेल्या पदाचा गैरवापर करू नका.....
कोणाचा  अपमान करू नका आणि कोणाला कमीही लेखू नका.....
-  तुम्ही खूप शक्तिशाली असाल,पण वेळ ही तुमच्यापेक्षाही शक्तिशाली आहे.....
- कोणी कितीही महान झाला असेल,पण निसर्ग कोणाला कधीच लायकीपेक्षा महान बनण्याचा क्षण देत नाही.......
स्वतःवर कधीही अहंकार करू नकोस......
देवाने तुमच्या-माझ्यासारख्या किती जणांना मातीतून घडवलं आणि मातीतच घातलं.....

Friday, 12 May 2017

*9 short stories worth reading* ..

1. *FALL and RISE*
Today, when I slipped on the wet tile floor a boy in a wheelchair caught me before I slammed my head on the ground.  He said, “Believe it or not, that’s almost exactly how I injured my back 3 years ago .

2. *A FATHER'S ADVICE*
Today, my father told me, “Just go for it and give it a try!  You don’t have to be a professional to build a successful product.  Amateurs started Google and Apple.  Professionals built the Titanic

3. *The POWER of UNIQUENESS* .
Today, I asked my mentor – a very successful business man in his 70’s – what his top 3 tips are for success.  He smiled and said, “Read something no one else is reading, think something no one else is thinking, and do something no one else is doing.

4. *LOOKING BACK*
Today, I interviewed my grandmother for part of a research paper I’m working on for my Psychology class.  When I asked her to define success in her own words, she said, “Success is when you look back at your life and the memories make you smile.

5. *TRY and YOU shall KNOW*
I am blind by birth. When I was 8 years old, I wanted to play baseball. I asked my father- "Dad, can I play baseball?" He said "You'll never know until you try." When I was a teenager, I asked him, - "Dad Can I become a surgeon?". He replied "Son, you'll never know until you try." Today I am a Surgeon, just because I tried!

6. *GOODNESS & GRATITUDE*
Today, after a 72 hour shift at the fire station, a woman ran up to me at the grocery store and gave me a hug.  When I tensed up, she realized I didn’t recognize her.  She let go with tears of joy in her eyes and the most sincere smile and said, “On 9-11-2001, you carried me out of world trade centre.
 
7. *LOOKING BACK*
Today, as my father, three brothers, and two sisters stood around my mother’s hospital bed, my mother uttered her last coherent words before she died. She simply said, “I feel so loved right now. We should have gotten together like this more often.”

8. *AFFECTION*
Today, I kissed my dad on the forehead as he passed away in a small hospital bed.  About 5 seconds after he passed, I realized it was the first time I had given him a kiss since I was a little boy.

9. *SHARING*
Today, I was traveling in Kenya and I met a refugee from Zimbabwe.  He said he hadn’t eaten anything in over 3 days and looked extremely skinny and unhealthy.  Then my friend offered him the rest of the sandwich he was eating.  The first thing the man said was, “We can share it.”

_Cheers to life_😊😊

Thursday, 11 May 2017

एक छानशी कथा

एका प्रवासी बोटीचा भर समुद्रात अपघात होतो.

त्याच बोटीवर एक जोडप (पती-पत्नी) प्रवास करत असतात.

ते दोघेही एकमेकांचे जीव की प्राण असतात. बोटीच्या अपघातामुळे ते एकमेकांना वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असतात.

त्यांची नजर आधारासाठी काहीतरी शोधण्यासाठी चहूकडे भीरभीरत असते.

आणि अचानक त्यांना एक जीवरक्षक बोट दिसते.
एका म्हणीत म्हटलेल आहे की,

*"डुबत्याला काठीचा आधार"*

अगदी तसच होते, ते दोघेही जिवाच्या आकांतान त्या जीवरक्षक बोटीजवळ येतात.

परंतु त्यांची घोर निराशा होते.  त्यांना दिसत की, बोटीत फक्त एकच जागा शिल्लक आहे.

पती, पत्नीला बुडत्या बोटीवर मागे ठेउन जीवरक्षक बोटीत उडी मारतो.

पत्नी बुडत्या बोटी वर थांबते.

बोट पाण्याखाली जाण्याआधी ती पतीकड़े पाहून जीवाच्या आकांताने काही तरी ओरडून सांगण्यांचा प्रयत्न करते.

शिक्षक गोष्ट सांगायचे थांबवतात.

*वर्गात निरव शांतता*

वर्गातील प्रत्तेक विद्यार्थी अगदी मन लावून तल्लीन होवून गोष्ट ऐकण्यात गुंग झालेला असतो.

अनपेक्षितपणे शिक्षकांनी गोष्ट सांगायची का थांबवली हा प्रत्तेकालाच प्रश्न पडलेला असतो. आणि तेवढ्यात शिक्षक  वर्गातील मुलांना विचारतात की,

*पत्नी पतीला काय म्हणाली असेल?*

बहुतेक विद्यार्थी तर्क करुन सांगतात की, पत्नी पतीला म्हणाली असेल,

*'मला तुम्ही धोका दिलात, मी तुम्हाला ओळखलेच नाही, तुम्ही स्वार्थी आहात..!'*

प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपआपली मते मांडली. तेवढ्यात शिक्षकांचे एका विद्यार्थ्याकडे लक्ष जाते.

एक मुलगा मात्र गप्पच असतो.
शिक्षक त्याला विचारतात, *"अरे, तुला काय वाटते ते पण सांग!"*

तो मुलगा म्हणतो,

*"गुरुजी, मला वाटत, त़ी म्हणाली असेल, मुलांना सांभाळा..!"*

शिक्षक चकित होउन विचारतात, "तुला ही गोष्ट माहीत आहे का?"

तो नकारार्थी मान हलवतो आणि म्हणतो, *"नाही गुरुजी, मला माहित नाही. पण; माझी आई वारली तेंव्हा शेवटच्या श्वासाला ती हेच म्हणाली होती!"

"तुझे उत्तर बरोबर आहे!"
शिक्षक हलकेच म्हणाले.
बोट बुडाली. पतीने घरी जाउन, मुलीला एकट्यानेच लहानाचे मोठे केल.

खूप वर्षानंतर, वार्धक्याने त्या पतीला जेंव्हा मरण आले तेंव्हा, त्याच्या पश्चात राहिलेले सामान आवरत असताना, त्याच्या मुलीला एक डायरी सापडते.

त्यातून असे समजते की, तीच्या आईला आधीच दुर्धर आजार झालेला असतो.

आणि ती त्यातून वाचणार नसते. त्यामुळे पतीला स्वत: जीवंत रहाण्याव्यतिरिक्त दूसरा पर्यायच नसतो.

त्या डायरीत पतीने पुढे लिहिलेले असते, *"तुझ्या शेजारीच जलसमाधी घ्यायची माझी किती इच्छा होती. पण आपल्या मुलीसाठी मला तुला त्या सागराच्या तळाशी एकटीलाच कायमसाठी सोडून याव लागल!"*

ही गोष्ट आपल्याला सांगण्या मागचा एवढाच उद्देश की,  चांगल्या किंवा वाईट कृतीच्या पाठीमागे, कधी कधी मोठी गुंतागुंत असते. जी आपल्या सहज लक्षात येत नाही.

त्यामुळे वरवर पाहून आपण कुणाहीबद्दल लगेच मत बनवून घेउ नये.

*जे कोणत्याही कामात पुढाकार घेतात, ते मुर्ख असतात म्हणून नव्हे तर त्याना त्यांची जबाबदारी कळते म्हणून.*

*जे भांडल्यावर आधी क्षमा मागतात, त्यांची चुक असते म्हणून नव्हे,तर त्यांना आपल्या माणसांची पर्वा असते म्हणून.*

*जे तुम्हाला मदत करायला पुढे सरसावतात ते तुमचे काही देणे लागतात म्हणून नव्हे, तर ते तुम्हाला खरा मित्र मानतात म्हणुन...!*

🌹🌷🌹💞🌹🎈🌹🌺🌹