Whenever I thought of doing something new . . . I don’t know where to begin from.... So here is few of my creativity samples and thoughts . . . Just an update to myself
Saturday, 5 January 2019
Friday, 4 January 2019
*मी पैसा बोलतोय*
सर्वात आधी मी तुम्हाला माझा परिचय करून देतो,
मी आहे पैसा. माझ रूप साधारण आहे, पण जगाला व्यवस्थित ठेवण्याची क्षमता माझ्यात आहे.
मनुष्याची नियत आणि प्रकृती बदलण्याची क्षमताही माझ्यात आहे कारण मनुष्य मला आदर्श समजतो.
आहो काही लोक तर माझ्यासाठी आपला जात, धर्म सोडतात, आपल्याच लोकांना धोका देतात, आपला आत्मसन्मान गहाण ठेवतात.
आहो एवढंच नाही तर माझ्यासाठी आपला देह विकतात, लक्षात ठेवा मी चांगल्या आणि वाईट गोष्टीत कधीच फरक करत नाही,
परंतु लोक मला स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी वापरतात.
मी राक्षस नाही, पण लोक माझ्यासाठी अपराध करतात.
हे सत्य आहे कि मी देव नाही पण लोक माझी देवा प्रमाणे पूजा करतात.
खर तर मी लोकांच्या सेवेसाठी आहे पण लोकच माझे गुलाम झाले आहेत.
मी कधी कुणासाठी त्याग नाही केला पण लोक माझ्यासाठी स्वतःचाहि जीव देतात तर कधी दुसऱ्याचा जीव घेतात.
मला तुम्हांला काही गोष्टी लक्षात आणून द्यायच्या आहेत सांगायच्या आहेत. मी तुम्हाला सगळ विकत घेऊन देऊ शकतो.
मी तुमच्यासाठी घर विकत घेऊ शकतो .......
..... पण तुमच्या घरात घरपण नाही आणू शकत.
मी तुमच्यासाठी औषध आणू शकतो ......
.....पण तुमच वय नाही वाढऊ शकत.
मी तुमच्यासाठी घड्याळ विकत घेऊ शकतो .......
.....पण गेलेली वेळ नाही.
मी तुमच्यासाठी मोठे पद विकत घेऊ शकतो ......
.....पण आदर नाही.
मी तुमच्यासाठी मखमली गादी विकत घेऊ शकतो ....
.....पण शांत झोप नाही.
मी तुमच्यासाठी पुस्तके विकत घेऊ शकतो .....
.....पण विद्या नाही.
मी तुमच्यासाठी रक्त विकत घेऊ शकतो ......
.....पण कोमेजून जात असलेले जीवन नाही.
म्हणून लक्षात ठेवा
*पैसा हेच सर्वस्व नाही*
*पैसा जरुर कमवा पण त्यासाठी आयुष्यातले सुंदर क्षण गमावू नका* .
पैश्याची पूजा जरूर करा पण पैश्याचे गुलाम बनू नका.
माणसासाठी पैसा बनला आहे. पैश्यासाठी माणूस नाही.
आपल कुटुंब, आपले नातेवाईक, आपले मित्र-परीवार, आप्तेष्ठ हेच आपले धन आहे.
त्यांना जाणीव पूर्वक जपा, कारण जेव्हा तुम्हाला देवाच बोलावण येईल तेव्हा मी तुमच्या सोबत नाही येऊ शकत.
तुम्ही केलेला परोपकार, दुसऱ्यांना दिलेला आनंद, मातृ पितृच भक्ती, त्यांची सेवा व देशसेवा हेच खरं तुमचे धन आहे. तेव्हा सेवा, साधना करा.
मग आयुष्यात तुमच्या सारखे सुखी कोणीही नसणार...............

इन्स्टंट मनी ऑर्डर (iMO)
प्रिय मित्रांनो !
समजा, तुम्ही बाहेरगावी गेलात आणि तिथे तुमच्याकडे असलेली नगद रक्कम संपली तर ?
समजा, तुम्ही प्रवासात आहात आणि कुणीतरी तुमची पर्स चोरली तर?
समजा, तुम्ही शिक्षणासाठी दुसऱ्या शहरी राहतात आणि तुम्हाला तात्काळ फी भरायची आहे. तर?
समजा, दुसऱ्या गावात असतांना अचानक दवाखान्यात ऍडमिट होण्याची वेळ आली तर?
समजा…. असो मंडळी !
अशा अचानक संकटात सापडण्याच्या शक्यता भरपूर आहेत.
पण अशावेळी आपण काय करतो ? सुरुवातीला भांबावून जातो.
कारण जवळ काहीच पैसे नसतात. एटीएम कार्ड चोरीला गेले असते. जर सोबत असेल तरी त्यांच्याही अकाउंटमध्ये गरजेइतके पैसे नसू शकतात.
अनोळखी शहरात कुणी ओळखीचे नसते. मदत मागायची तरी कोणाकडे ?
आणि ओळख पाळख नसतांना कुणी पैशांची मदत करेल याची शक्यता फारच कमी !
या अडचणीवर एक उपाय आहे! उपाय साधा सोपा आहे आणि खात्रीचा सुद्धा !
अशावेळी तुम्ही सरळ पोस्ट खात्याला शरण जा. तिथं तुम्हाला नक्कीच मदत मिळेल.
तुम्ही आपल्या नातेवाईक/मित्रांकडून पैसे एका मिनिटात पोस्टात मागवू शकता आणि दुसऱ्या मिनिटाला ते त्वरित काढू शकता. ते सुद्धा पोस्टात अकाउंट नसतानाही... आश्चर्य वाटलं ना ?
पण हे खरं आहे. भारतीय पोस्टाने ही सेवा सुरू केली आहे. नाव आहे, इन्स्टंट मनी ऑर्डर (iMO).
"इन्स्टंट मनी ऑर्डर" ही वेबवर आधारित सेवा आहे. ही सेवा काही मिनिटांतच पैसे एका शहरातून दुसऱ्या शहरात पाठवण्यासाठी मदत करते. याद्वारे १००० ते ५०००० पर्यंत रक्कम पाठवता येते.
iMO चं काम कसं चालतं?
जी व्यक्ती पैसे पाठवणार आहे, तिला कुठल्याही iMO सेंटर असलेल्या पोस्टात जाऊन काउंटरवर एक फॉर्म भरून काउंटर क्लार्ककडे रक्कम जमा करावी लागतो.
मग कॉम्प्युटरद्वारे त्याची पावती मिळते.
ही पावती जरा वेगळ्या स्वरूपाची असते. ती सीलबंद स्वरूपात येते. या पावतीमध्ये एक १६ अंकी सिक्रेट कोड असतो. हा कोड क्लार्कलासुद्धा माहीत नसतो.
मग ती पावती उघडून तो कोड ज्या व्यक्तीला पैशांची गरज आहे तिला सांगायचा.
हे काम तुम्ही कॉल करून, एसएमएस करून, व्हाट्सअप वरून किंवा इ-मेल द्वारे कसेही पाठवू शकता.
आता ती दुसरी व्यक्ती जिला पैसे हवे आहेत ती कुठल्याही iMO सेंटर असलेल्या पोस्टात जाऊन काउंटरवर एक छोटा फॉर्म ओळखपत्राच्या पुराव्यासह भरून देईल.
त्यात तो 16 अंकी कोड लिहायचा असतो. दुसऱ्याच मिनिटात त्या व्यक्तीच्या हातात पैसे मिळतील. आहे ना अगदी सोपं ?
पुराव्यासाठी कोणते ओळखपत्र लागतात?
ज्यावर फोटो आहे असं कोणतंही ओळखपत्र, म्हणजे आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पॅन कार्ड, पासपोर्ट, रेशनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, इत्यादीपैकी काहीही चालू शकेल.
ही सेवा खर्चिक आहे का?
अजिबात नाही ! मंडळी यासाठी फक्त शंभर रुपयांच्या आसपास कमिशन लागते. एवढी मोठी रक्कम तुम्ही अगदी अल्प दरात पाठवू शकता.
1000 ते 10000 ला 100 रुपये कमिशन
10001 ते 30000 ला 110 रुपये कमिशन
30001 ते 50000 ला 120 रुपये कमिशन
एवढंच नाही तर तुम्ही पैशांसोबत एखादा छोटा मेसेज सुद्धा पाठवू शकता.
हा संदेश पाठवणारा आणि स्वीकारणारा यांच्या व्यतिरिक्त इतर कुणी वाचू शकत नाही.
संकलन: अनिरुद्ध पळशीकर, पुणे.

एक छिद्र उरलेलं...
महाभारतातील ही गोष्ट तुम्हाला माहीत आहे का ?
एक गरीब म्हातारा हस्तिनापूरला गेला. काहीतरी दान मिळेल या आशेनं तो धर्मराजाला भेटला. परंतु तो पर्यंत सूर्यास्त झाला होता. त्यानं धर्मराजाला काहीतरी दान द्यावं अशी विनंती केली.
तेव्हा धर्मराज त्याला म्हणाले,
'आता सूर्यास्त झाला आहे. त्यामुळे मी आता दान देवू शकत नाही. तू उद्या सूर्योदयानंतर केव्हाही ये. मी तुला निराश करणार नाही.'
तो गरीब म्हातारा नाराज होवून परत फिरला.
या दोघांमधला संवाद बाजूला बसलेले भीमसेन ऐकत होते. तो गरीब म्हातारा निघून गेल्यानंतर भीमसेन धर्मराजाला म्हणाले,
'दादा, तुम्ही त्या याचकाला उद्या सकाळी दान देण्याचं वचन दिलं आहे. पण एक विचारू !
माणसाला दुस-या दिवशीच्या आयुष्याची खात्री देता येते ?'
धर्मराजाला स्वतःची चूक कळली त्यांनी लगेच त्या गरीब म्हाता-याला बोलावलं आणि भरपूर दान दिलं.
भीमानं विचारलेला हा प्रश्न छोटासा असला तरी तो अस्वस्थ करणारा आहे. आणि हा प्रश्न जो स्वतःला विचारतो आयुष्याचं खरं महत्त्व कळतं.
''तो काल मला भेटला होता, आज तो नाहीय',
'तो मघाशी माझ्याशी फोनवर बोलला होता, आत्ता तो नाहीय.'
असे अनेक प्रसंग आपल्या आजूबाजूला नेहमी घडत असतात.
हा क्षण माझा आहे.
पुढचा क्षण माझा नाही,
हे एकदा का आपण आपल्या मनात रूजवले की संताप, चीड, द्वेष, मत्सर या सगळ्या भावना आपोआप गळून पडतात आणि हातात राहते सूर ताल, लय, ठेका घेवून आलेलं आयुष्याचं रंगीबेरंगी गाणं !
जी मोठी माणसं किंवा नेते मंडळी असतात,
ते गेल्यानंतरही त्यांचे चौकात पुतळे होतात,
जे शास्त्रज्ञ, विचारवंत असतात,
त्यांचे विचार आपल्याला ते गेल्यानंतरही पुस्तकातून भेटतात.
जे कलावंत, गायक, खेळाडू असतात,
ते गेल्यानंतरही ते त्यांच्या कलेतून, कृतीतून आपल्याला आठवतात.
पण आपल्यासारख्या सामान्य माणसाचं काय ? शरीरातून जीव गेल्यानंतर कुठे असतो आपण ? कुठल्या रूपात मागे उरतो आपण ?
*माझ्या घरात*
*आज मी आहे,*
*उद्या मी नसेन,*
*माझ्या जागी*
*एक मिणमिणता दिवा* *असेल .*
*दहा दिवसांनी तो दिवा विझेल*
*त्या जागी माझा एक फोटो असेल,*
*लाकडी चौकट*,
*कोरीव नक्षीकाम,*
*हसरा फोटो.*
*काही दिवसांनी*
*माझ्या लटकलेल्या फोटोवर*
*साचलेली धूळ असेल*
*किंवा त्या फोटोची पातळ काच*
*वेडीवाकडी तडकलेली असेल .*
*काही वर्षांनी*
*माझा तो हसरा फोटो*
*भिंतीवरच्या छिद्रातून*
*खिळ्यासकट निखळलेला असेल...*
*आणि मग त्यानंतर*
*पिढ्यान् पिढ्या*
*माझ्याच घरात*
*माझ्या नावाचं*
*फक्त उरलेलं एक छिद्र* *असेल !*
आपलं रूपांतर अशा छिद्रात होण्यापूर्वी आपल्याला दानात मिळालेल्या ह्या श्वासांच रूपांतर आपण 'उत्सवात' करायचं का ?
कोणाला ही दुखवू नका,
कोणालाही कमी लेखू नका,
कोणाचाही अपमान करु नका,
कारण, तुम्ही केलेले हे कर्म तुमच्याकडेच येणारे असते .

Saturday, 29 September 2018
Subscribe to:
Posts (Atom)