Pages

Wednesday, 28 September 2016

बेअरफुट

जयपूरपासून १०० किमी अंतरावर तिलोनिया नावाचं एक छोटंसं गाव आहे. बंकर रॉय नावाच्या एका अवलियाने तिथे ‘बेअरफुट कॉलेज’ नावाच्या एका जादुई वास्तूची स्थापना केली आहे. त्याविषयीच तुम्हाला थोडक्यात सांगायच आहे -

दिल्लीत शिक्षण पूर्ण करून बंकर रॉय यांनी भारत भ्रमण करायचे ठरवले. ते राजस्थान मधल्या या गावात आले.

‘आपण खूप शिकलोय तेव्हा इथल्या अशिक्षित लोकांना आपण शिकवू’ असं त्यांच्या अहंकाराला वाटलं.

जसजसा त्यांचा या लोकांशी संबंध वाढला, तसतसं बंकर यांच्या लक्षात येऊ लागलं की वरकरणी अडाणी दिसणाऱ्या मंडळींकडे अनेक ज्ञान-कौशल्ये आहेत. तेव्हा याच लोकांकडूनच आपण काहीतरी शिकलं पाहिजे.

यातूनच जन्म झाला – बेअरफुट कॉलेजचा.

१९७५-८० च्या काळात निर्मिती झालेली ही वास्तू पाहण्यास आता जगभरातून लोक येतात. या प्रयोगास अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाले आहेत.

संपूर्ण वास्तू शून्य विजेवर आणि शंभर टक्के सौर उर्जेवर चालते. या वास्तूमधील जेवणासकट सर्व सेवा सुविधा कमालीच्या साध्या. वायफळ खर्च नाही. माणसं अतिशय लाघवी व नम्र. अतिशय साधे सुती कपडे घातलेली ही माणसे बोलू लागली की नुसतं ऐकत बसावसं वाटतं.

मध्यंतरी एका नेत्याच्या मुलाखतीनंतर ‘women empowerment’ हा शब्द विनोदाचा विषय झाल्याचे अनेकांना आठवत असेल. ‘women empowerment’ म्हणजे काय हे अनुभवायचे असेल तर ‘बेअरफुट कॉलेज’ ला भेट द्यावी लागेल.

दर वर्षी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ग्रामीण भागातील अशा सुमारे शंभर स्त्रियांना ‘सौरउर्जा उपकरणे’ बनवण्याचे प्रशिक्षण दिले जाते. हे शिक्षण देणाऱ्या सर्व महिला या त्याच गावातील ‘सहावी सातवी’ च्या पुढे न शिकलेल्या महिला आहेत. राजस्थानी पारंपारिक वेशातील या महिला शिक्षिका आफ्रिकन देशातील महिलांना शिकवताना पाहून आपण अक्षरशः अवाक होतो.

येस, नो, ओके या शब्दांच्या व्यतिरिक्त एकही ‘कॉमन’ शब्द माहित नसताना, केवळ खुणांच्या माध्यमातून आणि काही विशिष्ट संकेतांच्या माध्यमातून सुमारे सहा महिने हे शिक्षण चालू असतं. सोलर कुकर, सोलर हीटर, सोलर दिवे वगैरे उपकरणे महिलाच बनवतात आणि बाजारात यशस्वीपणे विकून दाखवतात.

याच गावातील काही ‘कमी शिकलेल्या’ (?) महिला दंतवैद्यकशास्त्र शिकून ‘रूट कॅनल’ वगैरे करतात हे पाहून आपल्याला फक्त चक्कर यायची बाकी असते.

या कॉलेजचं स्वतःचं एफएम रेडियो स्टेशन आहे. सकाळी एक तास आणि संध्याकाळी एक तास असे रोज कार्यक्रम असतात.

ज्या लोकांकडे बघून ती धड बोलतील की नाही अशी शंका यावी अशी माणसे ते रेडियो स्टेशन अतिशय शिताफीने चालवतात. एक एक धक्के पचवत बेअरफुट कॉलेजची सैर चालली होती.

शेवटचा षटकार अजून बाकी आहे, याची कल्पना नव्हती. एका संगणकासमोर काही उपकरणे घेऊन एक स्त्री बसली होती. वय अंदाजे पन्नास. डोक्यावर घुंघट. त्यातून डोकवणारे सगळे केस पिकलेले.

मी विचारलं, ‘आप क्या कर रही हो?’ अतिशय आत्मविश्वासाने समोरून उत्तर आलं – ‘मै रेडियो एडिटिंग कर रही हुं’…

मी विचारलं, ‘आपके सामने जो मशीन्स है, उसके बारे मे आपको सब मालूम है?’

त्या स्त्रीने जे उत्तर दिलं, ते केवळ बेअरफुट कॉलेजच्या तत्वज्ञानाचं एका वाक्यात सार नव्हतं, तर आपल्या सर्वांच्या ‘शैक्षणिक अहंकाराला’ मारलेली चपराक होती. ती स्त्री म्हणाली,

‘ये बटन पे क्या लिखा है वो मै पढ नही सकती | पर ये बटन दबाने के बाद क्या होता है, वो मुझे मालूम है !’

आपण थोडंफार शिकलो, आता आपली पुढची पिढी शिकतेय. त्या स्त्रीने जे सांगितलं.

नेमकं तेच आपल्या शिक्षणातून हरवून गेलंय. मार्क, टक्के, मेरीटलिस्ट, अॅडमिशन वगैरे बाजारू कल्लोळात ‘खरं शिक्षण’ बाजूलाच पडलंय. मार्क, टक्के वगैरे गोष्टींना कमी लेखायचा उद्देश नाही. पण त्यातच फार अडकून गेलोय आपण.

इंग्रजी आलं पाहिजे ते शेक्सपिअर वाचायला नव्हे, तर नोकरीच्या इंटरव्ह्यूमध्ये उत्तरं द्यायला.

विज्ञान आलं पाहिजे ते या विश्वातलं कुतूहल शमवायला नव्हे, तर माझं ‘अॅग्रीगेट’ वाढवायला.

संस्कृत आलं पाहिजे ते माझ्या परंपरेच्या पाउलखुणा शोधायला नव्हे, तर ते स्कोरिंग आहे म्हणून. शिकायचं असतं ते

जगण्यातलं ‘शहाणपण’ (wisdom) मिळवायला. हे सगळं विसरून आपण इतके हीन आणि दीन कधी झालो?

शिकण्याला आत्मविश्वासाचे व रोकड्या व्यवहाराचे पंख फुटले की काय चमत्कार घडू शकतो हे सांगणारं बेअरफुट कॉलेजचं उदाहरण पुरेसं बोलकं आहे.

Tuesday, 29 March 2016

Sujata Mall. . .New Collection March 2016


Bracelet and Kdaz






Finger Ring
Zumkazz 










Long Chains and Necklines Accessories 



Small Earrings


Clips and Rubber Bands














Tuesday, 1 December 2015

🍀🌾 स्त्रिचा पदर 🌾🍀

Yesterday I came across one very interesting and heart touching message, I am just sharing with you all.

🍁  पदर  काय  जादुई  शब्द  आहे . . . . हो  मराठीतला ! 
काना नाही, मात्रा नाही, वेलांटी नाही, अनुस्वार  नाही.  एक  सरळ. . .  तीन अक्षरी  शब्द.. .  पण  केवढं  विश्‍व  सामावलेलं  आहे त्यात....!!  किती  अर्थ,  किती  महत्त्व... काय  आहे  हा  पदर.......?

साडी नेसणाऱ्या  स्त्रीच्या  खाद्यावर रुळणारा  मीटर  दीड मीटर  लांबीचा भाग.......!! तो   स्त्रीच्या   लज्जेचं   रक्षण   तर करतोच,   सगळ्यात   महत्त्वाचं  हे कामच   त्याचं.   पण,   आणखी   ही बरीच  कर्तव्यं  पार  पाडत  असतो. या   पदराचा   उपयोग  स्त्री  केव्हा, कसा  अन्‌  कशासाठी  करेल, ते  सांगताच  येत  नाही. 

स्त्रि सौंदर्य   खुलवण्यासाठी   सुंदरसा पदर   असलेली    साडी   निवडते. सण-समारंभात   तर   छान-छान पदरांची   जणू   स्पर्धाच लागलेली असते.  सगळ्या  जणींमध्ये  चर्चाही तीच. .....!!

लहान  मूल  आणि   आईचा  पदर, हे   अजब  नातं  आहे.  मूल  तान्हं असताना   आईच्या   पदराखाली जाऊन  अमृत   प्राशन  करण्याचा हक्क   बजावतं. .....!! जरा  मोठं  झालं,  वरण-भात  खाऊ लागलं,  की  त्याचं  तोंड  पुसायला आई  पटकन  तिचा  पदर पुढे  करते . . .मूल   अजून   मोठं   झालं,   शाळेत जाऊ  लागलं,  की  रस्त्यानं  चालताना  आईच्या  पदराचाच  आधार लागतो.   एवढंच   काय,   जेवण  झाल्यावर  हात  धुतला, की  टाॅवेल ऐवजी  आईचा  पदरच  शोधतं आणी  आईलाही  या  गोष्टी   हव्याहव्याशा वाटतात  मुलानं  पदराला  नाक  जरी पुसलं,  तरी  ती  रागावत  नाही ...त्याला  बाबा  जर रागावले, ओरडले तर मुलांना पटकन  लपायला आईचा पदरच  सापडतो.....!!

महाराष्ट्रात  तो  डाव्या  खांद्या  वरून मागे सोडला  जातो.....!!तर  गुजरात,  मध्य प्रदेशात  उजव्या खांद्यावरून पुढं  मोराच्या पिसाऱ्यासारखा   फुलतो ....!!

काही   कुटुंबात   मोठ्या   माणसांचा मान  राखण्यासाठी   सुना  पदरानं चेहरा  झाकून  घेतात ..तर  काही  जणी  आपला   लटका ,राग     दर्शवण्यासाठी     मोठ्या फणकाऱ्यानं   पदरच   झटकतात ! सौभाग्यवतीची  ओटी  भरायची ती  पदरातच  अन्‌  संक्रांतीचं   वाण लुटायचं   ते  पदर   लावूनच.

बाहेर   जाताना   उन्हाची   दाहकता थांबवण्यासाठी  पदरच  डोक्यावर ओढला  जातो,  तर  थंडीत  अंगभर पदर   लपेटल्यावरच   छान   ऊब मिळते....!! काही   गोष्टी   लक्षात   ठेवण्यासाठी पदरालाच   गाठ   बांधली   जाते .अन्‌   नव्या   नवरीच्या   जन्माची गाठ   ही   नवरीच्या   पदरालाच,नवरदेवाच्या   उपरण्यासोबतच बांधली   जाते.....!!

पदर   हा   शब्द   किती   अर्थांनी  वापरला  जातो  ना.....?नवी  नवरी   नवऱ्याशी   बोलताना पदराशी  चाळे  करते, पण संसाराचा राडा  दिसला,  की  पदर कमरेला   खोचून   कामाला   लागते. देवापुढं आपण चुका कबूल  करताना म्हणतोच  ना .....?माझ्या   चुका  " पदरात "  घे.‘

मुलगी मोठी  झाली,  की  आई  तिला साडी   नेसायला   शिकवते,  पदर सावरायला   शिकवते   अन्‌   काय म्हणते  अगं,  चालताना  तू  पडलीस तरी  चालेल. ....!! पण,   " पदर "  पडू   देऊ   नकोस ! अशी  आपली  भारतीय  संस्कृती. अहो  अशा  सुसंस्कृत आणी सभ्य मुलींचा विनयभंग तर  दुरच्   ती. रस्त्यावरून चालताना लोकं तिच्याकडे   वर  नजर  करून  साधे पाहणार   ही   नाहीत   ऊलटे   तिला  वाट  देण्या साठी  बाजुला सरकतील एवढी  ताकत  असते त्या  "पदरात" ....... !

हा पदर जपण्याची . . . आणि तो तसाच टिकवण्याची आपली सर्वांची जबाबदारी आपण पूर्ण करुया.

Thursday, 13 August 2015

Sujata Mall- Rakshyabandhan Special Rakhi Collections

New Rakhi Collection - ye bandhan he pyaar ka. . . 

Rs. 30/- each
Ra. 40 /- each
Rs.150/-
Rs.30/- each
Rs. 10/- each
Rs. 20/- each
Rs. 40/- each
Dev Rakhi Rs. 5/- for 3