विषय पूर्ण वेगळा आहे तरिही
सॉफ्टवेअर इंजिनियर असलेल्या श्वेता चं लग्न ठरलं आणि आईच्या पोटात गोळाच उठला...मुलगी दूर चालली म्हणून? नाही...तर श्वेता च्या स्वभावामुळे...
श्वेता शाळेपासून कायम अव्वल..अभ्यास सोडून इतर कुठेही लक्ष नसे...अगदी पुस्तकी किडा... नोकरीतही तसंच... कायम कामात लक्ष...जीव ओतून काम करायचं..अगदी ओव्हरटाईम सुद्धा...त्यामुळेच तिला पटापट बढती मिळत गेली...
पण ही कामात इतकी गुंतलेली असे की इतर कुठल्याही गोष्टीत लक्ष नाही...तिला ना घरकाम माहीत होतं ना संसार कसा करायचा या गोष्टी...
आईने तिला इतर गोष्टी शिकवायचा खूप प्रयत्न केला, पण हिला सवड असेल तर ना..
होणारा नवरा सुद्धा सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि त्यामुळे तुला कामात मदत होईल...अशी समजूत घालून श्वेता ला तयार केलं गेलं होतं..
पण आईची काळजी वाढत चाललेली..ही मुलगी ऑफिस कामाशिवाय दुसरं काहीही करत नाही. सांगायला गेलं की दुर्लक्ष करते..कसा होणार हिचा संसार?
आईच्या चेहऱ्यावरची सल होणाऱ्या सासूबाईंनी ओळखली...
"विहीनबाई... काळजीत दिसताय...काही अडचण तर नाही ना?"
आई विचार करते, आणि अखेर सांगून टाकते..
"माफ करा पण जे खरं आहे ते तुम्हाला सांगते...उद्या जाऊन अडचण यायला नको, तिची तक्रार यायला नको म्हणून...आमची श्वेता अगदी पुस्तकी किडा... तिला बाहेरचं जग माहीतच नाही. घरातलं एक काम येत नाही..स्वयंपाक येत नाही..तुम्हाला होकार तर दिलाय, पण उद्या काही अडचण आली तर? माफ करा, पण तुम्हीही एकदा विचार करा...तिला संसार करायचा आहे...पण तिचा स्वभाव हा असा...ती कमी पडली तर तुमची फसवणूक केली असा आरोप..."
"इतकंच ना?" सासूबाई मधेच तोडत म्हणाल्या...
"हे बघा मी सुद्धा इंजिनियरिंग कॉलेज ला प्राध्यापक होते...या इंजिनियर मुलांचा स्वभाव चांगला परिचित असतो मला...काळजी करू नका..संसार करायला मी शिकवेल तिला.."
"पण तुम्हाला.."
"घाबरू नका..आता श्वेता ची जबाबदारी माझी..काही चुकलंच तर मी जबाबदार..."
श्वेता च्या आईला हायसं वाटलं..
लग्नाच्या दिवशी मुहूर्ताची वेळ झाली...श्वेता नवरीच्या वेशात खूप सुंदर दिसत होती..
"मुलीला बोलवा..."भटजींनी आदेश सोडला...
"श्वेता खोलीत नाहीये..."
सर्वांना घाम फुटला..शोधाशोध सुरू झाली...
पण सासूबाईंनी बरोबर ओळखलं...त्या टेरेस मध्ये गेल्या... श्वेता तिच्या लॅपटॉप वरून क्लाइन्ट्स सोबत व्हिडीओ कॉल वर होती...सासुबाई तिचं बोलणं होईस्तोवर थांबल्या... व्हिडीओ कॉल वरचा माणूसही 15 मिनिटांवर लग्न येऊन ठेपलेल्या नवरीशी मिटिंग करताना अवाक होऊन बघत होता...
श्वेता चं आटोपलं...सासूबाईंना बघून ती जरा घाबरली..
"डेडलाईन मिस झाली का??" श्वेता ने विचारलं..
"तुला मुहूर्त म्हणायचंय का?"
"अं?? I MEAN...तेच..."
"नाही अजून..एक्सटेंड केलीये डेडलाईन... चल आता.."
लग्न आटोपलं..बिदाई च्या वेळी आई रडत होती, तेव्हा स्नेहा तिची समजूत घालत होती...
"अगं location shift झालं म्हणून कुणी रडतं का?"
आईने कपाळावर हात मारून घेतला...सासूबाईंना हसू आवरेना..नवऱ्याला तिच्या या स्वभावावर प्रेमच जडलं होतं...
आता सासरी सासूबाई तिला कशी ट्रेनिंग देतात..तिला' टेक्निकल भाषेत संसार कसा करावा हे कसं शिकवतात हे वाचा पुढील भागात..
++++++×
*टेक्निकल संसार (भाग 2)*
Sanjana Ingale February 02, 2020
श्वेता सासरी तर आली, पण खरी कसोटी सासूबाईंची होती. श्वेता ची जबाबदारी त्यांनी घेतली होती आणि आता तिला घडवायचं होतं नव्याने, संसारासाठी...
श्वेता सासूबाईंकडे आली, जरा दचकतच म्हणाली,
"आई, तुम्हाला तर माझा प्रॉब्लेम माहितीये, मी प्रत्येक गोष्ट टेक्निकली बघते...मी माझ्या कामातून बाहेर येऊच शकत नाहीये...खूप प्रयत्न केला मी...माझं काही चुकलं तर समजून घ्या..."
"तू बोललीस हेच खूप झालं..आता फक्त मी सांगते तेवढं कर.."
श्वेता मन लावून ऐकू लागली..
"हे बघ, आता हे घर म्हणजे तुझं नवीन वर्क लोकेशन समज..नव्या लोकेशन वर आल्यावर आपण आधी काय करतो?"
"तिथल्या वर्क कल्चर सोबत जुळवून घेतो.."
"बरोबर...मग आता तेच करायचं आहे..तुझी इंटर्नशिप सुरू होतेय.."
"इंटर्नशीप" हा टेक्निकल शब्द ऐकताच श्वेता ला अगदी हायसं वाटलं...कारण संसार, नातीगोती, सासुरवास अश्या अवजड शब्दांची भीती तिच्या मनात बसली होती...
"हे बघ, इंटर्नशिप मध्ये आपण सिनियर्स चं काम बघतो, त्यांच्याकडून शिकून घेतो, त्यांना अडचणी विचारतो..आता तेच करायचं..."
"ठीक आहे..मी तुम्ही जे कराल ते सगळं शिकून घेईल.."
"बरं चल..पहिली गोष्ट स्वयंपाक.. आपल्या घरी फक्त बायकांनाच स्वयंपाक करावा लागतो असं नाही..तुझा नवरा आणि सासरे मदत करतात रोज...प्रत्येकाला पूर्ण स्वयंपाक येतो...तुलाही शिकावा लागेल.."
"Okk... मग यासाठी काही manual वगैरे.."
सासुबाई हसल्या..आणि रेसिपीज चं पुस्तक तिच्या हातात ठेवलं...
"हे वाच..आणि नीट अभ्यास कर.."
श्वेता ने मन लावून ते वाचायला सुरुवात केली...
2 दिवसांनी तिने सासूबाईंसमोर रिपोर्ट ठेवला...
"आई...मी पूर्ण स्टडी केला आहे...हा प्रोजेक्ट रिपोर्ट...स्वयंपाकात ज्या गोष्टी कायम लागतात त्यांची लिस्ट...आणि कुठल्या पदार्थातून किती calories मिळतात हेही नमूद केलंय... तुम्हाला रक्त कमी आहे, बीट चा हलवा तुम्हाला योग्य असेल...बाबांचे सांधे दुखतात, त्यांना शेवगा आणि यांना कॅल्शियम साठी फळं.."
"अगं माझे बाय..." सासूबाईंनी तिची दृष्टच काढली...टेक्निकली का असेना..पोरगी संसार अचूकतेने शिकत होती...तिच्या साफ मनाचं सासूबाईंना कौतुक वाटलं...त्यांनी तो प्रोजेक्ट रिपोर्ट घेतला आणि घरात सर्वांना दाखवला...घरातल्यांना त्यावर हसावं की रडावं कळत नव्हतं.. पण सासूबाईंनी डोळे वटारले तसे ते दोघेही वाह वाह करू लागले...
लग्नाच्या गडबडीत घर बरंच खराब झालेलं...वस्तू अस्ताव्यस्त पडल्या होत्या..पडदे खराब झालेले...अश्या वेळी घर आवरायला श्वेता ला शिकवायचं होतं...
सासूबाई म्हणाल्या,
"खूप साऱ्या errors येत आहेत. Warning मेसेज पण फार आलेत.."
"Error आणि warning message हे शब्द ऐकून श्वेता पळत बाहेर आली.."
"मला सांगा...कुठली लाईन चुकलीये?? माझ्या कोडींग मध्ये एकही लाईन ला error मेसेज येत नाही.."
सासूबाई हसल्या..
"चांगलंय, पण error कोडिंग मध्ये नाही...या घरातून येतेय..."
"म्हणजे??"
"म्हणजे बघ ना..वस्तू चुकीच्या जागेवर आहेत...घर मातकट झालंय. धूळ जमा झालीये...या सर्व घरातल्या errors आहेत…आणि घरात झुरळं झालीये..हा घर अस्वच्छ झाल्याचा warning सिग्नल आहे..."
"मग ह्या errors आणि warning signal काढावेच लागतील...चला...आपण सर्व सफाई करून घेऊ..."
दोघींजनी कामाला लागतात आणि घर अगदी चकाचक करून टाकतात...
श्वेता म्हणते..."no errors...now you can compile the code.."
"Still there is an error..."
सासूबाई म्हणतात..
"कुठली error बाकिये?"
"घर तर साफ केलंस, पण आपण दोघी किती मळलोय??"
श्वेता हसली, मी येते अंघोळ करून...
सासूबाईंनीही अंघोळ केली..आणि अश्या प्रकारे इंटर्नशिप चा पहिला आठवडा सुखरूप पार पडला..
सासूबाईंना संध्याकाळी फोन...गावाकडून काही मंडळी भेटायला येणार आहेत...नव्या सूनबाईला पाहायला..
सासूबाईंना घाम फुटला...श्वेता एक तर अशी..मनाने कितीही साफ असली तरी लोकं तिचं वागणच पाहणार...आपल्यासारखं समजून घेणार नाहीत ते..आणि उगाच परत जाऊन माझ्या सुनेची बदनामी करणार...
यावर तोडगा काढणं आवश्यक होतं, तेही टेक्निकल भाषेतच...सासू पुढे काय शक्कल लढवते बघा पुढील भागात..
3=====
*टेक्निकल संसार (भाग 3)*
Sanjana Ingale February 03, 2020
गावाकडची मंडळी 4 दिवसांनी येणार होते..सासूबाईंच्या मनात काहूर उठलेलं... श्वेता ला कसं तयार करावं? श्वेता आपली खोलीमध्ये कोडिंग करत बसलेली...कामात अगदी मग्न होती...तिने काही दिवस वर्क फ्रॉम होम घेतलं होतं...
सासूबाई पुस्तकं चाळत बसल्या...कॉलेज ला असताना त्या सॉफ्टवेअर चे विषय शिकवायच्या...त्या स्वतः इंजिनियर होत्या...एक पुस्तक चाळत असताना त्यांना सहज एक chapter हाती लागला...SDLC मॉडेल... Software development life cycle...
कुठलंही सॉफ्टवेअर बनवत असताना काही प्रक्रियेतून जावं लागतं...त्यांना एकदम हसू आलं...त्यांना मार्ग सापडला...
त्या श्वेता च्या खोलीत गेल्या...श्वेता काम करत होती…
"श्वेता...नवीन प्रोजेक्ट आलाय.."
श्वेता पटकन आपलं काम बाजूला ठेऊन सासुबाईंचं ऐकू लागली...
"कुठला?"
"अगं गावाकडची पाहुनी येणार आहेत...बिग बजेट प्रोजेक्ट असेल बरं का..."
"ओहह...मग आता काय काय करायचं सांगा.."
"विशेष काही नाही, SDLC मॉडेल नुसार workout करायचंय..."
श्वेता उत्सुकतेने ऐकू लागली...तिचं आयुष्य त्यातच तर गेलं होतं..
"SDLC..म्हणजेच software development life cycle...कुठलाही सॉफ्टवेअर प्रोजेक्ट यशस्वी व्हावा यासाठी काही प्रक्रिया पार पाडाव्या लागतात...अंदाधुंदी कुठलाही प्रोजेक्ट करता येत नाही..."
"Okk... कुठलं सॉफ्टवेअर develop करायचंय?? आणि कुठल्या प्लॅटफॉर्म वर?"
सासूबाई हसल्या..
"Relationship software...रिलेशन्स स्ट्रॉंग होतील असं एक सॉफ्टवेअर... त्यातून आपलं स्किल दिसायला हवं...हे सॉफ्टवेअर एकदा यशस्वी झालं की मग आपला गुणांचा डेटाबेस सुरक्षित राहील...हाच डेटाबेस वापरून गावाकडची मंडळी आपलं मार्केटिंग करतील..mouth publicity..."
"Interesting..."
सासूबाईंनी सुरवात केली..
"पहिली फेज आहे planning... गावाकडच्या मंडळींना खुश ठेवता येईल असं काय करावं? त्यांच्या आवडीचं काय बनवावं? त्यांना फिरायला कुठे न्यावं? त्यांना भेट म्हणून काय काय द्यावं याची planning.."
"Okk... म्हणजे बघा..गावाकडे बायका साडी नेसून डोक्यावर पदर घेतात..त्यांना आवडतं ते...आणि गावरान रेसिपीज आवडतील त्यांना...रेसिपी बुक मधून मी नोट्स काढल्या आहेत त्याचा उपयोग होईल...आणि इथे जवळपास फिरण्यासारखं काय आहे हे गुगल मॅप वर बघेन मी..."
सासुबाई खुश..
"पुढचं आहे .. Requirement analysis. जी मंडळी येणार आहेत ती कोणत्या वयाची आहेत, त्यांची काही पथ्य आहेत का, सोबत लहान मुलं आहेत का, किती जण येणार आहेत ही सगळी माहिती जमा कर..नंतर आहे सॉफ्टवेअर design अँड development...आपण जे प्लॅन केलं आहे ते implement करायचं...नंतर टेस्टिंग...ती लोकं आपल्या प्रॉडक्ट ने खुश आहेत का...हे बघत राहायचं...त्यांना काही errors वाटल्या तर लगेच त्यात सुधारणा करायची...नंतर deployment अँड मेन्टेनन्स...फायनल प्रॉडक्ट् डिलिव्हर झालं तरी त्यांना आनंदाने निरोप देऊन त्यांच्याशी संपर्क ठेवायचा...म्हणजे एकदम स्ट्रॉंग रिलेशनशिप सॉफ्टवेअर डेव्हलप होईल....."
श्वेता कान देऊन सगळं ऐकत होती...तिला काहीतरी वेगळं करायला मिळणार होतं... नवीन चॅलेंज तिला मिळालं आणि उत्साहाने ती त्या टास्क मागे लागली..
सासूबाईंनी सांगितल्याप्रमाणे सर्व प्लॅनिंग आणि requirement analysis तिने केलं..
सासुबाई तिची मेहनत कौतुकाने पाहून निर्धास्त झाल्या..
उद्या पाहुणे येणार म्हणून सासूबाईंनी काही तयारी केली, त्या दमल्या आणि दुपारी जरा पहुडल्या...
अचानक दारावरची बेल वाजली..श्वेता दार उघडेल असं त्यांना वाटलं, पण ती काही बाहेर आली नाही..शेवटी सासूबाई स्वतः उठल्या आणि बघतो तर काय...
पाहुणे एक दिवस आधीच हजर...
डोक्यावर पांढरी टोपी घातलेले 2 आजोबा, नऊवारी साडीतील 3 आज्जी..ओठापासून वर एक मिलिमीटर अंतर बाकी असलेला शेम्बुड आलेला लहान मुलगा...डोक्यावर पदर घेऊन तिरक्या डोळ्यांनी पाहणारी 1 बाई आणि नकतेच लाल पिचकारी मारून आलेले 2 पुरुष...
त्या सर्वांना अचानक आलेलं पाहून सासूबाईंना घाम फुटला, त्यांनी चटकन डोक्यावर पदर घेतला आणि त्यांच्या पाया पडल्या...
ते आले...हॉल मध्ये बसले..
"सुनबाई दिसत नाही.."
सासूबाई आता पुरत्या घाबरल्या...
सगळी मेहनत वाया गेली...सगळं हातातून गेलं...असं समजत सासूबाई श्वेता ला हाक देणार इतक्यात किचन मधून श्वेता पाण्याचा ग्लासेस चा ट्रे घेऊन आली...काठापदराची साडी...डोक्यावर पदर..गळ्यात मंगळसूत्र... कपाळावर मोठी टिकली, जोडवे, बांगड्या, सोन्याचे कानातले....सासूबाई बघतच राहिल्या...
(पुढची गम्मत पूढील भागात)
4====
*टेक्निकल संसार (भाग 4)*
Sanjana Ingale February 03, 2020
श्वेता ला अश्या टिपिकल अवतारात पाहून सासूबाई गोंधळल्या...श्वेता ने सर्वांना पाणी दिलं... सासूबाई म्हणाल्या...
"जा चहा ठेव..."
"कुठे ठेऊ??"
श्वेता ने प्रतिप्रश्न केला तसा पाहुण्यांपैकी 2 जणांना पिता पिता ठसका आला...सासूबाईंनी ते डोळेच बंद केले..इतक्यात समोर बसलेली आजी म्हणाली..
"फार विनोदी आहे हो तुझी सून..."
सर्वजण हसायला लागले...
त्यांचा मते श्वेता ने विनोद केला होता..पण श्वेता ने खरोखर साळसूदपणे तो प्रश्न विचारला...
"आलेच मी.."
सासूबाई श्वेता ला घेऊन आत गेल्या...चहा ठेवला... आणि श्वेता ला नेऊन द्यायला सांगितला...
आतापर्यंत सर्व सुरळीत चालू होतं...पण पाहुण्यांनी आता त्यांच्या सवयी दाखवायला सुरू केलेलं... आजोबांनी खोकलून खोकलून घर दणाणून सोडलं होतं...आज्यांनी घरभर तपकीर सांडून ठेवली..लहान मुलांनी घरभर घाण करून ठेवली..
त्यांच्यातली एक इंदू आजी श्वेता जवळ आली, त्यांनी श्वेता ला नखशिखांत न्याहाळलं..आजोबा मंडळी श्वेता ला एकेक ऑर्डर सोडत होते...लहान मुलं श्वेता कडे सारखं खायला मागू लागली...
त्यांच्यातली एक सून श्वेता च्या मदतीला आली...आणि हळूच कुजबुज करू लागली..
"फार करावं लागतं माय तुला..कसकाय सहन करतेस गं??"
"मला तर तसं काही वाटलं नाही...सिम्पल algorithm आहे कामांचा.."
"आं??"
त्या बाईला काही कळलं नाही..
"सासूची जातच अशी असते...आता तुला कामाला जुंपून स्वतः मस्त बसल्या आरामात..."
त्या दोघी सून नावाच्या एकाच कॅटेगरीमध्ये असल्याने सासूच्या चुगल्या करता येतील असं त्या बाईला वाटलं..पण तिला काय माहीत, श्वेता कुठल्या कॅटेगरी मधली होती ते...
"तसं नाही..object oriented वागणं आहे त्यांचं... त्यातलं polymorphism नुसार वागताय त्या...योग्य ठिकाणी योग्य भूमिका...."
"आं? म्हंजी?"
"A person at the same time can have different characteristic. Like a man at the same time is a father, a husband, an employee. So the same person posses different behaviour in different situations. This is called polymorphism.."
ती बाई हळूच बाजूला झाली...हे काही आपल्याला झेपणार नाही हे तिच्या लक्षात आलं...
श्वेता काही बोलत नसली तरी ती वैतागली होती... तिला पाहुण्यांचा थोडा त्रास होऊ लागला..सासूबाईंनी हे ओळखलं...
दुपारी सर्वजण आराम करत होते, श्वेता आपल्या खोलीत काम करत बसली होती...सासूबाईंनी घरातलं वायफाय बंद केलं...श्वेताला प्रश्न पडला, नेट का गेलं असेल? ती वायफाय चेक करायला गेली...
"वायफाय कुणी बंद केलं?"
"मी केलं.." सासूबाई म्हणाल्या...
श्वेता ला कारण कळलं नाही...
सासूबाईंनी समजावलं..
"जोपर्यंत हे वायफाय चालू असतं तोवर आपल्याला त्याची किंमत कळत नाही..पण कनेक्शन बंद झालं की मग आपण एकटे पडतो, आपला जगाशी संपर्क तुटतो...
ही गावाकडची मंडळी तशीच आहेत..तुझ्या सासऱ्यांना शिकण्यासाठी पैसे नव्हते, तेव्हा याच लोकांनी त्यांना मदत केली...स्वतः अजूनही खेडेगावात राहतात, पण दुसऱ्यांनी प्रगती करावी म्हणून मदतीला कायम तयार असतात...यांच्यामुळे आपलं गावाकडचं कनेक्शन ऑन राहतं... आपली नाळ गावाशी जोडून राहते, ती जर तुटली तर आपण एकटे पडू...वायफाय आपल्या लहरींनी प्रत्येकाला जोडून घेतं...अगदी अंतराची मर्यादा ओलांडून योग्य ती सुविधा आपल्यापर्यंत पोहोचवतं...गावाकडच्या मंडळींचा थोडा त्रास होईल तुला, पण..."
"हे कनेक्शन कधीच बंद होऊ देणार नाही मी...वचन देते आई तुम्हाला..."
सासूबाईंच्या डोळ्यात पाणी आलं..श्वेता आता वैतागत नव्हती...सर्व पाहुण्यांचं आपुलकीने आणि कृतज्ञतेने करत होती...
स्वयंपाक बनवतांना सासुबाई श्वेता ला मदतीला घेत होत्या... शिरा करतांना वेलदोडे घेतले, त्यातले दाणे बाजूला केले आणि ते खलबत्त्यात कुटायला घेतले..
"एक query आहे.."
"विचार.."
"आपण दाणे काढण्यापेक्षा अख्खे वेलदोडे जर कुटून टाकले तर??"
प्रश्न गंभीर होता...
सासुबाई विचार करतात...आणि म्हणतात..
"Bad user experience..."
"Ohh..."
वेलदोडे अख्खी टाकली तर वरचं साल पूर्ण बारीक होत नाही..खातांना ते जाणवतात...कडक लागतात...
"म्हणजेच bad user experience..."
"Right..."
पाहुणे जेवतात, जेवणाचं आणि सुनेचं तोंडभरून कौतुक करतात...आजी श्वेता ची दृष्ट काढतात...
"खरंच गुणाची हाय तुझी सून..."
असं म्हणत ते निरोप देतात...
संध्याकाळी सर्वजण हॉल मध्ये बसलेले असताना श्वेता गावाकडे फोन लावते...
"पोहोचले ना नीट? प्रवासात काही त्रास तर झाला नाही ना?"
श्वेता ने त्यांचा नंबरसुद्धा घेऊन ठेवलेला..आणि फोन करायचं माझ्याही डोक्यात नाही आलं ते श्वेता ने केलं..सासूबाईंना अजून कौतुक वाढलं...
श्वेता ने फोन ठेवला तशी ती म्हणाली..
"Final phase in progress ... Maintenance..."
(पुढे काही वर्षांनी श्वेता ला मूल होऊ देण्यासाठी सासू टेक्निकल भाषेत कशी तयार करते, बघुया आता ...)
5 ======
*टेक्निकल संसार (भाग - ०५)*
**
श्वेता चा संसार सासुसोबत तर मजेत चालला होता, पण तिचा नवरा सोहम सुद्धा या सर्व गोष्टी एन्जॉय करत होता. पण कितीही झालं तरी प्रेम टेक्निकल भाषेत करता येत नाही, त्याला प्रेमाचीच भाषा लागते. सोहम साठी ती सगळं काही करत होती... पण ड्युटी म्हणून. एकदा सोहम ने विचारलं, "तुझ्यासाठी मी कोण आहे?"
"My husband.."
"तसं नाही गं... माझ्याबद्दल तुला काय वाटतं?"
"माझा पार्टनर आहेस... सर्व गोष्टीत आपले समान शेअर्स आहेत... आणि त्याची लीगल प्रोसेस लग्नात झालेली आहे.."
सोहम कपाळावर हात मारून घेतो..
श्वेता ला त्याची अवस्था समजते, आणि ती म्हणते..
"आपण दोघेही variables आहोत..पण dependent variables... एकमेकांवर आपण depend आहोत... तूला काही झालं तर त्रास मला होतो... तू नाराज असला तर माझ्या मनाला रुखरुख लागते... आणि माझ्यावर काही संकट आलं तर तू माझी ढाल बनून सामोरा जातोस... variable असलो तरी एकमेकांशी एकरुप आहोत आपण... एका variable मध्ये बदल झाला की दुसऱ्याला झळ लागते..."
सोहम आ वासून बघत होता... टेक्निकल भाषेत का असेना, श्वेता रोमँटिक बोलत होती..
"मी तुझा computer तर तू माझा cpu... मी तुझा कीबोर्ड आणि तू माझा..."
"बोल बोल...मी तुझा?"
"उंदीर..."
"Mouse???"
श्वेता हसायला लागते, दोघांची चांगलीच पिलो फाईट होते... आणि टेक्निकल प्रेमही चांगलंच बहरायला लागतं...

संध्याकाळी दोघांनाही पार्टी ला जायचं असतं... एका मोठ्या कंपनीच्या मालकाची पार्टी होती... दोघेही तयार होऊन निघाले... एका मोठ्या हॉटेल शेजारी गाडी लावली... श्वेता ला एक फोन आला... तिने सोहम ला पुढे जायचा इशारा केला...
सोहम जात असताना त्याला त्याचा एक मित्र भेटला.
"काय मग... कसा चाललाय संसार.."
"संसार? एकदम मजेत... टेक्निकली... हा हा.."
"म्हणजे?"
"सोड तुला नाही कळणार.."
"बरं नको सांगू... पण एक लक्षात ठेव... बायकोला कधीही आपल्या वरचढ होऊ देऊ नकोस... अरे घर सांभाळणाऱ्या स्त्री चा शिक्षित स्त्री पेक्षा नक्कीच जास्त उपयोग असतो.. शिकलेली मुलगी फक्त तिचा स्वतःचा विचार करते...."
बोलता बोलता दोघेही गेटपाशी जातात..
"थांबा... तुम्हाला जाता येणार नाही..."
"का?"
"Invitation कार्ड आणलंय का सोबत?"
"नाही..."
"मग त्याशिवाय आत जाता येणार नाही.."
"अहो असं कसं.."
"हे बघा, ही खूप मोठ्या कंपनीची पार्टी आहे..."
दोघांत बराच वाद होतो..
शेवटी सोहम चा मित्र म्हणतो,
"जाऊदे, असा अपमान होत असेल तर नकोच ती पार्टी.."
इतक्यात मागून श्वेता येते...
"काय झालं? Any problem??"
श्वेता ला पाहताच गेटवरचा माणूस उभा राहतो, अदबीने नमस्कार करतो...
"आपण कार्ड आणलं नाही, so आपल्याला आत सोडणार नाही.." सोहम म्हणाला...
"माफ करा साहेब.. मला माहित नव्हतं तुम्ही मॅडम सोबत आहात ते... खरंच माफी मागतो मी... मॅडम चं या कंपनीत सारखं उठणं बसणं असायचं... फार मान होता मॅडम ला इथे... माझ्यापासून सर्वजण त्यांना ओळखतात... तुम्ही जा आत.."
सोहम च्या मित्राला चांगलीच चपराक मिळाली... सोहम त्याला हळूच म्हणाला...
"स्त्री शिक्षित असो वा गृहिणी... तिचं कर्तृत्व पेलण्याचा पुरुषार्थ आपण दाखवला तरच स्वतःला पुरुष म्हणून घेणं योग्य असेल..."
श्वेता ने ते गपचूप ऐकलं.. आणि ती सोहम च्या अजूनच प्रेमात पडली... आपल्या स्वभावाला समजून घेणारा, आपल्या हुषारीचा आदर करणारा आणि जीवापाड जपणारा सोहम आज तिला नव्याने उमगला होता...
दोघेही घरी येतात.. फ्रेश होतात... श्वेता आपल्या खोलीत जाते.. तिला सासूबाईंच्या खोलीतून हुंडक्यांचा आवाज येतो... ती तडक खोलीत जाते...
सासूबाई रडत असतात..
"आई? काय झालं??"
"प्रेरणा चा फोन आला होता.."
"मग?? सगळं ठीक आहे ना??"
"रडत होती ती... तिला सासरी फार त्रास देताय गं... सासर सोडून माहेरी यायचं म्हणतेय..."
प्रेरणा श्वेता ची नणंद... सासरी जाऊन वर्ष झालेलं... पण कुरबुर सुरू असायची... प्रेरणा तशी बोलायला खमकी होती... तिचा स्वभाव श्वेता ला माहीत होता...
श्वेता काही वेळ विचार करते आणि म्हणते..
"आई... प्रेरणा ला फोन लावा आणि माझ्याकडे द्या.."
श्वेता ज्या आत्मविश्वासाने सांगत होती, सासूबाईंना समजलं की श्वेता कडे याचं सोल्युशन नक्की असणार.. टेक्निकल भाषेतलं...
*क्रमशः*
*(श्वेता नणंदेला टेक्निकल भाषेत कशी समजावते... बघा पूढील भागात...)*
6===
टेक्निकल संसार (भाग 6)
Sanjana Ingale February 05, 2020
सासरी भांडण करून माहेरी फोनवर तपशील देणाऱ्या प्रेरणाचा स्वभाब श्वेता ला चांगलाच माहीत होता. प्रेरणा चं मन कितीही साफ असलं तरी बोलण्याने ती सगळं घालवून देत असे.
सासूबाईंनी प्रेरणा ला परत फोन केला..
"वाहिनि काय सांगतेय ऐक.."
'वहिनी' शब्द कानावर येताच श्वेता च्या जाणिवा जागृत झाल्या... एका मोठ्या जबाबदारी ची जाणीव झाली...तिने फोन घेतला आणि प्रेरणा ला समजावलं..
"हे बघ...तू मी सांगितलेल्या काही ट्रिक्स वापर, बघ फरक पडतोय का ते.."
"म्हणजे नेमकं काय करू?"
"म्हणजे बघ...आधी मशीन लेव्हल लँग्वेज वापर...ते जसं 0 आणि 1 मधेच इन्स्ट्रक्शन देतं तसं तू सासरी फक्त 'हो' किंवा 'नाही' मध्ये उत्तरं दे...बाकी काहीही बोलू नकोस...त्याने फरक पडला नाही तर असेम्बली लेव्हल लँग्वेज वापर..ज्यात फक्त मोजके शब्द वापरायचे...आणि तरीही फरक पडला नाही तर higher लेव्हल लँग्वेज चा वापर कर..."
"आईकडे फोन दे.." प्रेरणा म्हणाली...
"आई अगं वहिनी काय बोलतेय हे??"
"वहिनी आहे तुझी, तुझ्या चांगल्याचंच सांगेल.तिने जेवढं सांगितलं तेवढं ऐक..."
श्वेता ला गहिवरून आलं..तिला आता नाती समजू लागली होती...ऑफिस मध्ये सिनियर्स चं ऐकायचं ते फक्त फायद्यासाठी... पण घर नावाच्या ऑफिस मध्ये..कुठलाही फायदा न बघता, कसलीही अपेक्षा न ठेवता एकमेकांचा आदर करत नाती कशी जपली जातात हे श्वेता शिकली...
सासूबाईंनी श्वेता ला खूप मोठा मान दिला होता..आणि या मानासोबतच श्वेता ला आपली जबाबदारीही वाढली आहे याची जाणीव झाली..
संध्याकाळी सोहम आल्यावर श्वेता त्याला काय हवं नको विचारू लागली...घरात कुणाला काय हवं ते ती पाहू लागली...घरासाठी खूप काही करू लागली...एका कृत्रिम स्वभावाच्या मुलीचं परिवर्तन संसार नावाच्या जिवंत भावनेत झालं होतं...
काही दिवसांनी प्रेरणा चा फोन...
"आई... अगं वहिनीची ट्रिक काम करून गेली...मी मशीन लँग्वेज काय सुरू केली अन सर्वजण माझ्याशी नीट वागू लागले.."
"मग..म्हटलं होतं ना..वाहिनी आहे तुझी...तिचं ऐक म्हणून.."
"म्हणजे आता मुलीपेक्षा सुनेचं कौतुक लागायला लागलं की तुला आता.."
"तू जशी माझी मुलगी तशीच ती"
श्वेता ने ते ऐकलं आणि तिचे डोळे भरून आले..
2 वर्षे अशीच गेली...
एक दिवस सोहम श्वेता ला म्हणाला..
"मी काय म्हणतो...आपण नवीन प्रॉडक्ट् लाँच करूयात ना आता.."
"कुठलं.."
"आपल्या दोघांचं.."
"म्हणजे??"
"म्हणजे...तू...मी..आणि आपलं तिसरं..."
"कोण तिसरं??"
श्वेता ला सोहम चा रोख समजला होता... पण मुद्दाम न समजल्याचा आव ती आणत होती..
हा विषय निघायचा तेव्हा मात्र श्वेता काहीशी गंभीर व्हायची.
आतापर्यंत संसार, नातीगोती तिने आत्मसात केलं.. पण एक गोष्ट तिने सोहम पासून लपवली होती..
आपण मूल होऊ द्यायचं नाही असं तिने आधीपासूनच ठरवलं होतं...मुलाच्या संगोपनात आयुष्याची कितीतरी वर्ष निघून जातात आणि आपलं भविष्य आपण घडवू शकत नाही असं तिला वाटे...
सासूबाईंनी सुद्धा तिला या बाबतीत थोडसं विचारलं..यावेळी मात्र तिने स्पष्ट सांगितलं..
"माफ करा...मी कसं सांगू तुम्हाला मला कळत नाहीये.."
"काय सांगायचंय.??"
"मला...आई व्हायचं नाहीये.."
सोहम चिडला..
"तुझं आत्तापर्यंत आम्ही सर्व सहन केलं..तुला साधं घरात काय करतात, नाती काय असतात, संसार काय असतो हे माहीत नव्हतं... आम्ही तुला सांभाळून घेतलं..तुझ्या प्रत्येक चुका पोटात घातल्या...आणि तू? फक्त स्वतःचाच विचार करतेय...आम्हाला काय हवंय याचा विचार केलास कधी? पास्तावलो मी तुझ्याशी लग्न करून.."
आज पहिल्यांदा दोघांत इतका वाद झाला होता..तेही सासूबाईंसमोर...
श्वेता च्या कानात सोहम चे शब्द घुमु लागले..
"पास्तावलो तुझ्याशी लग्न करून.."
श्वेता खोलीत जाऊन रडू लागली..
"खरंच मी अशी आहे म्हणून काहीच उपयोगाची नाही का? माझा काहीच उपयोग नाही का? मी घरासाठी काहीच केलं नाही का??"
ती स्वतःला अपराधी समजू लागली...संसाराची पहिली झळ तिला बसली होती..
पण आता सासूबाईंनी कसोटी होती..
टेक्निकल भाषेत अपत्य का होऊ द्यायचं हे समजवण्याची...
क्रमशः
7 ==
टेक्निकल संसार - (भाग 7)
Sanjana Ingale February 07, 2020
"श्वेता, इकडे येतेस का जरा."
सासूबाईंनी हाक मारली..
सोहम आणि श्वेता च्या भांडणामुळे घरात वातावरण तसं खराबच झालेलं...श्वेता ला वाटलं आता सासूबाई सुद्धा मूल होऊ देण्यासाठी मला समजावणार...थोड्या नाराजीतच ती गेली..सासूबाई म्हणाल्या...
"तुला एक नवीन चॅलेंज.."
"कुठलं??"
"Kotlin नावाची प्रोग्रामिंग लँग्वेज तुला शिकायचीए.."
श्वेता ची कळी खुलली, बाळाचा विषय नाही काढला हे पाहून तिला जरा बरं वाटलं..
"Kotlin?"
"हो...आता त्याच लँग्वेज ला जास्त स्कोप आहे..."
श्वेता एकदम उत्साहात तयार झाली..तिला असं नवनवीन शिकायला आवडायचं...
पण शिकताना खूप अडचणी आल्या...थोडा त्रास झाला..कधी कधी ती अगदी वैतागून जायची...पण सासूबाईंना शब्द दिला होता..
श्वेता ने ती लँग्वेज शिकायला सुरवात केली..सोबतच घरातलं स्वयंपाकाचं ट्रेनिंग चालू होतं...
"आई..मला गाजर हलवा शिकवा..."
"का गं असा अचानक??"
"उद्या बाबांचा वाढदिवस आहे ना.."
"अरेच्या..मी विसरले होते बघ..तुला बरं लक्षात राहीलं.."
"हो मग..सर्वांच्या वाढदिवसाचा डेटाबेस मेंटेन केलाय मी.."
सासूबाई हसल्या..
"बरं तुला प्रोसेस सांगते, त्यानुसार कर.."
सासूबाई तिला सगळी रेसिपी सांगतात..आणि दुसऱ्या दिवशी श्वेता छानसा गाजर हलवा सर्वांना वाटते..घरात सर्वजण खुश होतात...
"आई..मी हलवा केलाय खरं.. पण वस्तू मला सापडत नव्हत्या लवकर.."
"होना गं.. किचन मधल्या वस्तू इतक्या झाल्या आहेत ना की वेळेवर सापडत नाही.."
"मी अरेंजमेंट करू का मग??"
"हो..का नाही...आता तुझंच घर आहे.."
श्वेता पूर्ण दिवस किचन आवरायला घेते...आणि वस्तूंची मांडणी करते..
सासूबाई येऊन विचारतात.."काय गं झालं का? मलाही सांग कशी अरेंजमेंट केलीये ते.."
"हे बघा...मसाल्याचे पदार्थ...एकाच data type चे असल्याने त्यांना त्या डब्याच्या array मध्ये fix केलंय...आणि रोजच्या ज्या वस्तू लागतात जसं की शेंगदाणे, डाळ, तांदूळ, रवा...त्या समोरच्या काचेच्या बरण्यांमध्ये manage केलेत...लेबल लावून त्यांना pointer दिलाय...फ्रीज मध्ये stack नुसार जो भाजीपाला लवकर खराब होतो तो सर्वात वर ठेवलाय, म्हणजे आपल्या लक्षात येईल आणि LIFO (last in first out) नुसार सर्व भाजीपाला वापरला जाईल...
सर्व डब्यांवर कंमेंट लाईन लिहिल्या आहेत..म्हणजे मध्ये काय आहे ते लगेच सापडेल..कडधान्य sorting alogorithm वापरून अरेंज केलाय..कसं आहे, काही कडधान्य वापरली नाहीत तर त्यात अळया होतात, बुरशी लागते... म्हणून ती सर्व वापरली पण गेली पाहिजे आणि खराबही होणार नाही अशी व्यवस्था केलीये..."
एका संसारी बाईलाही इतके बारकावे माहीत नसतील इतके बारकावे श्वेता ने हेरले होते...सासूबाईंनी तडक श्वेतात च्या आईला फोन लावून श्वेता चं तोंड भरून कौतुक केलं..
"पाहिलत का..श्वेता सगळा स्वयंपाक शिकलीये...किचन आवरलं तिने आज..घर अगदी उत्तम ठेवते...सर्व सण वार अगदी साडी नेसून साजरे करते..तक्रारीला काही जागाच नाही हो.."
आई घाबरली...इतका मोठा टोमणा??
"ताई मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं ना...श्वेता ला काही येत नाही म्हणून...आता मी तरी काय करू.."
"अहो तुमचा विश्वास बसत नाहीये का?? मी खरं बोलतेय..."
आई आता चक्कर येऊन पडायचीच बाकी होती..हे मी नक्की श्वेता बद्दलच ऐकतेय ना? त्यांना प्रश्न पडला..
काही दिवसांनी श्वेता आनंदाने सासूबाईंकडे आली..
"आई.. मी kotlin शिकले...सुरवातीला वाटलं किती अवघड आहे...पण जमलं मला...बघा मी एक application सुद्धा बनवलं यात.."
सासूबाई तिच्या जवळ आल्या...
"मग..कसा होता शिकण्याचा अनुभव??"
"सुरवातीला खूप अवघड गेलं...पण हळूहळू सवय झाली..आणि आता अगदी एक्सपर्ट झालीये...सगळा शीण निघून गेलाय अगदी...आणि नवीन ऍप्लिकेशन बनवल्याचं खूप समाधान मिळालं मला..."
"होना..आता मी काय सांगते ते नीट ऐक.. तुला राग येऊ देऊ नकोस...हे बघ, नवनिर्मिती चा आनंदच काहीसा वेगळा असतो..जेव्हा आपण मूल जन्माला घालतो तेव्हा तो वेगळा जीव नसून आपलंच प्रतिबिंब असतं. तुला आवडणार नाही का? तुझंच प्रतिबिंब तुझ्या डोळ्यासमोर अगदी इवल्याश्या जीवात? त्याच्या हसण्या बोलण्यातून तू स्वतःला पाहशील...हरवून जाशील त्याच्यात..तुला जसं एका हुशार आणि कर्तबगार मुलीचं बिरुद मिळालंय, त्याही पेक्षा मोठं असं एका स्त्रीत्वाचं वरदान तुला लाभलंय... आपल्या गर्भातून हे विश्व साकारण्याचं... नवनिर्माणाचं.…ते वरदान वाया जाऊ देऊ नकोस... विचार कर एकदा..."
सासुबाईंचा शब्दन शब्द श्वेताच्या काळजात घुसत होता...कितीही म्हटलं तरी मातृत्वाची एक आशा तिच्या मनात खोलवर होती...पण ती कधी बाहेर आली नव्हती... ती आज आली...तिला गर्भाच्या विलक्षण संवेदना जाणवू लागल्या..
क्रमशः
8=====टेक्निकल संसार (भाग 8 अंतिम) | marathi story
Sanjana Ingale February 07, 2020
श्वेता ला आईपणाची आशा जागृत झाली. सासुबाईंचं म्हणणं तिला पटलं होतं... एक नवीन जीव जन्माला घालायचा, जे आपलंच एक प्रतिबिंब असेल..ही भावनाच तिला खूप सुखावत होती.
संध्याकाळी सोहम घरी आला...ती म्हणाली..
"नवीन प्रॉडक्ट् लाँच करू म्हणतेय.."
"करा...तुम्हाला दुसरं काही सुचतं तरी का.."
सोहम चा राग अजूनही गेलेला नसतो..
"म्हणजे रेप्लिकेट करायचंय प्रॉडक्ट्..."
"कसलं रेप्लिकेट..."
"आपल्या दोघांचं.."
"काय बोलतेयस.."
"आपल्या दोघांचा स्वभाव inherit करून आपल्यापासून एक नवीन प्रॉडक्ट्.."
सोहम ला हे बोलणं कळत नव्हतं ..तो वैतागून खोलीच्या बाहेर गेला अन तितक्याच वेगाने परत आला..
"एक मिनिट...आपलं रेप्लिकेट म्हणजे..."
श्वेता हसायला लागते...
"श्वेता?? तू...आई.."
"होय..मी आई होण्याचा निर्णय घेतलाय..."
सोहम आनंदाने वेडा होतो...श्वेता ला उचलून तो गिरक्या घेऊ लागतो...
काही दिवसांनी श्वेता ला आनंदाची बातमी समजते...आणि घरात एकच आनंद पसरतो....सासूबाईंचे डोळे भरून येतात..त्या श्वेता च्या आईला फोन लावतात..
"अभिनंदन... तुम्ही आजी होणार आहात.."
श्वेता च्या आईची बोलतीच बंद होते..आनंदाच्या धक्क्याने तिचे बोल फुटतच नाही...
श्वेता सासूबाईंकडे जाते आणि विचारते...
"आता मी dual प्रॉडक्ट् carry करतेय...काही विशेष असं करावं लागेल का??"
"स्वतःची काळजी घ्यायची फक्त...वेळेवर जेवण, फळं आणि दूध पीत जा वेळेवर.."
"सासूबाई...मी इतकं काम केलं...तुम्ही सांगितल्याप्रमाणे लोकेशन चेंज केलं...सॉफ्टवेअर डेव्हलप केलं...पण मला त्या बदल्यात काहीच पगार मिळाला नाही अजून.."
सासूबाई धास्तावतात...श्वेता टेक्निकल विचार करते मग सॅलरी सुद्धा मागणार हे त्यांच्या लक्षातच आलं नाही..
"किती हवीय तुला?"
"माझ्या आधीच्या कंपनीत जेवढी मिळायची त्याहून जास्त.."
सासूबाईंनी माहिती काढली, श्वेता ला 40 हजार महिना पगार होता..दीड वर्ष होऊन गेलेलं...सासूबाईंनी आकडेमोड केली..बरीच मोठी रक्कम होती...
श्वेता ची जबाबदारी मी घेते हे वचन तिच्या आईला दिलं होतं... त्यामुळे आता हे सुद्धा त्यांनाच निस्तरायचं होतं..
त्यांनी बऱ्यापैकी पैसे जमा केले..आपल्या बांगड्या मोडल्या...सोहम आणि त्याचा वडिलांकडून पैसे घेतले आणि बरीच मोठी रक्कम जमा केली..
रविवारच्या दिवशी संध्याकाळी सर्वजण घरी असताना सासूबाईंनी सर्व पैसे एका पाकिटात घालून श्वेता ला दिले..
"श्वेता, ही तुझी सॅलरी.."
श्वेता ने दोन मिनिट पाकिटाकडे पाहिलं..ती म्हणाली,
"मला ही सॅलरी नकोय.."
"काय? मग काय हवंय तुला?"
"सासुबाई...माझ्यासारख्या टेक्निकल मुलीला तुम्ही माणसात आणलं...माझ्यात एका संसारी मुलीचे गुण आणले...तेही टेक्निकल पद्धतीने...हेच जर मी दुसरीकडे असती तर त्यांनी हाकलून लावलं असतं मला..तुम्ही मला आपलं समजलात...माझी जबाबदारी घेतली…याहून मोठी सॅलरी काय असू शकते?
माझ्यात आईपणाच्या संवेदना जागृत केल्या..मला माणसात आणलं...या सगळ्याची किंमत पैशात होऊच शकणार नाही...
आणि मला आता समजलंय..सॉफ्टवेअर मध्ये यांत्रिकपणे कोडिंग करून आपल्याला हवं तसं ऍप्लिकेशन करणं म्हणजे घर नाही..घर म्हणजे माणसं, माणसांच्या भावना...जिव्हाळा...प्रेम...आदर...काळजी....या सगळ्या गोष्टी कुठल्याच टेक्निकल पुस्तकात शिकायला मिळणार नाही...ज्या मला तुम्ही शिकवल्यात...
आता मला या घरासाठी, तुमच्यासाठी खूप काही करू द्या...उपकाराची परतफेड मला करायचीय...बस...एवढीच सॅलरी मागते मी..."
सासूबाईंना कृतकृत्य झाल्यासारखं वाटलं..श्वेताच्या आईला जे वचन दिलं होतं ते आज पूर्ण झालं होतं..
इतक्यात श्वेता ची आई घरात येते...
"ये आई...बस.."
"बसायचं जाऊदे...श्वेता तू खरंच...."
"होय...डबल बस आहे माझी आता..."
"मग आवर, माहेरी चल अश्या अवस्थेत...आराम होईल.."
माहेरी चल म्हटल्यावर सासू सासरे हळवे झाले..श्वेता ची त्यांना इतकी सवय झालेली की तिचं नसणं त्यांना आता सहन होणार नव्हतं...
"माहेरी कशाला? मी इथेच राहीन...सासूबाईंशिवाय माझी इतकी चांगली काळजी अजून कुणीच घेऊ शकणार नाही.."
सासूबाईंच्या डोळयांत पाणी आलं...
श्वेता ची आई म्हणाली..
"मुलीला माहेर विसरायला लावलंत हो तुम्ही...तुमचे हे उपकार मी आयुष्यात विसरू शकणार नाही..."
समाप्त
(कसा होता या पूर्ण कथा वाचनाचा प्रवास? कथा आवडली ना? लाईक कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे आपल्या सॉफ्टवेअर मित्र- मैत्रिणीना शेयर करा..)
*टेक्निकल संसार भाग-१*Sanjana Ingale January 31, 2020

No comments:
Post a Comment